author

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्व.सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिरचे लोकार्पण

नाशिक, दि. १० (जिमाका): नाशिक महानगरपालिकेतर्फे २५ कोटी रूपये निधी खर्चून हिरावाडी येथे साकारलेल्या स्व.सदाशिव गंगाराव भोरे कलामंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेविका प्रियंका माने, पूनम मोगरे, रूची […]

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

नाशिक :- संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, […]

श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण..पंतप्रधान नरेंद्र मोदीं

दिल्ली :- श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे. त्यांनी स्वतःला आमचे गृहमंत्री […]

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा यासाठी नागरिकांनी आग्रही राहावे; साहित्य संमेलनात अभिरूप न्यायालयातील मत जळगाव :- दि. ४ फेब्रुवारी मराठी भाषा मुळात अभिजात, संपन्न, घरंदाज आहे. आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे. शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मराठी नागरिक ही मराठी भाषेचा वापर कमी करत आहेत. […]

अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा भारतरत्न पुरस्कार गौरव’…

मुंबई :- अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.  “प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते अडवाणी जी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले […]

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश 

मुंबई :- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता […]

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. आज यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 25 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून […]

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी ५६ किलोमीटरचे दोन रिंगरोड…

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी ५६ किलोमीटरचे दोन रिंगरोड उभारणे प्रस्तावित करण्यात आले असून त्याला सिंहस्थ परिक्रमा असे नाव देण्यात आले आहे. या दोन्ही रिंगरोडचा सर्वे करण्यासाठी नियुक्त केलेल्या मोनार्क सल्लागार संस्थेने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येणार असल्याने त्याबाबतच्या कार्यवाहीसाठी मंत्रालयात […]

ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन..

‘सीयावर रामचंद्र की जय’ घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला नाशिक, दिनांक 12 जानेवारी, 2024 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री श्री. […]

नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हस्ते शानदार उद्घाटन…

युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी… नाशिक, दि. 12 जानेवारी, 2024 :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत […]