ईद-ए-मिलाद निमित्ताने बाजारपेठ सजली!

Eid-e-Milad :- ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील बाजारपेठ सजावटीच्या विविध वस्तूंनी सजली आहे. यात धार्मिक झेंड्यांसह विविध वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांकडून गर्दी केली जात आहे.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. गुरुवार (ता.२८) रोजी ईद साजरी करण्यात येणार आहे. शुक्रवार (ता.२९) रोजी जुने नाशिक परिसरातून जुलूस काढण्यात येणार आहे.

त्यानिमित्ताने तयारीस वेग आला आहे. घरोघरी रंगरंगोटी, सजावटीचे काम सुरू आहे. घर, दर्गा मशीद तसेच अन्य धार्मिक स्थळ, चौक, रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील चौक मंडई, दूध बाजार, बागवानपुरा विविध ठिकाणी सजावटीचे दुकाने सजली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षाच्या तुलनेत यंदा मुस्लिम बांधवांमध्ये अधिक उत्साह असल्याने वस्तू खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *