”राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई ?

मुंबई :- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विमा कंपन्यांना दिले. वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री […]

“कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार…

उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विदर्भ, मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी यातून पूर्ण करण्यात येईल. ही योजना २०१८ ते २०२० या वर्षात […]

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा जमा करणार?

नागपूर :- राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह‌्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी आज केली. […]

‘कांदाप्रश्न’ सोडविण्यासाठी २९ सप्टेंबरला दिल्लीत बैठक..

मुंबई :- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे २९ सप्टेंबरला बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. दिल्ली येथील बैठकीस राज्य मंत्रिमंडळ सदस्यांचे […]

सुनील पवार यांच्या संशोधनाची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल…

जुगाड करणारे शेतकरीपुत्र आपण नेहमीच सोशल मीडियावर बघत असतो. परंतु जळगावमधल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने अशा पावडरचं संशोधन केलंय ज्यामुळे तब्बल दोन महिने शेतीला पाण्याची गरज भासणार नाही. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या शेतकरीपुत्राची दखल घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथील सुनील पवार या तरुणाने हे भन्नाट संशोधन केले आहे. शेती क्षेत्रात […]

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारणार

मुंबई, – राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी […]

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक – मंत्री गिरीष महाजन

नाशिक :- राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा प्रश्नाबाबात आढावा घेण्यासाठी श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी […]

नाफेड अंतर्गत कांदा विक्री केंद्राचे उद्घाटन खासदार सदाशिव लोखंडे यांचे हस्ते संपन्न..

शिर्डी :- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे प्रयत्नातुन एनसीसीएफ रब्बी व द्वितीय टप्पा कांदा खरेदी शुभारंभ संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथिल महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी अंतर्गत श्रमविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीत हा खरेदी शुभारंभ करण्यात आला आहे.जागेवर २४१० रुपये प्रमाणे खरेदी आहे , बारदान वाहतूक खर्च वाचणार आहे, नगर जिल्ह्यातील चार ठिकाणी खरेदी केंद्र […]

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – मंत्री अब्दुल सत्तार

पुणे, दि. 24 : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्‍य शासनाने केंद्र शासनाकडे निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.  केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या शुल्काबाबत कृषी उत्पन्न बाजार […]

जिल्ह्यात खतांचा तुटवडा थांबणार; पालकमंत्र्यांनकडून संबंधित कंपनींची कानउघाडणी

नाशिक :– जिल्ह्यात खत टंचाई जाणवत असल्याची बाब निदर्शनास आल्याने नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी कृषि विभाग व सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांची नाशिक जिल्हयात अनुदानित खते पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांना गंभीर बाबी निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने सर्व कंपनीना पत्र व्यवहार करत दिलेले टार्गेट नुसार खत पुरवठा करण्याच्या […]