विज्ञान प्रेमी मित्र हो!

आजच्या लेखाची सुरुवात केली एका सुंदर, मनोहर हिंदी चित्रपट गीताने! या गाण्याचा आनंद घेता घेता व्यवहारी जगात मात्र पाय जमिनीला टेकलेले असावेत कारण, हे जग खूप स्पर्धेचे आहे. आपण सर्व सध्या आपल्या चंद्रयान – ३ त्या विचारात असतांनाच, आपल्या सभोवताली काय घडते आहे, काय घडणार आहे, त्याचेही भान राखावे लागते. पळा, पळा,कोण पुढे पळे तो! […]

चंद्रयान – ३ चंद्राकडे १९०० किलोमीटर प्रति सेकंड या गतिने, चंद्राभोवती १७० * ४३१३ किमी. या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रवास करत आहे..

इस्रोने ५ ऑगस्ट २०२३ ला चंद्राचे कक्षेत चंद्रयान – ३ ला पोहोचवले. आपल्यापैकी अनेकांनी चंद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो पाहिला असणार. आता ९ ऑगस्टला चंद्रयान पुढील आतल्या कक्षेत प्रवेश करेल. १७ ऑगस्टला चंद्रयान चंद्रापासून १०० किमी उंचीवर स्थिरावेल आणि २३ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. जनमानसात या योजनेची चांगली जागृती झालेली आहे […]