‘तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहृत बालिकेचा शोध.

नाशिक :- पोलीस आयुक्त अंकुश, शिंदे, पोलीस उप आयुक्त, किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुरनं ४४२ / २०२३ भादवि कलम ३६३ प्रमाणे दिनांक | १९/०९/२०२३ रोजी दाखल गुन्हयाचा तपास सपोनि / रोहित केदार, गुन्हेशोध पथक, पंचवटी पोलीस ठाणे हे करत होते. गुन्हयाचे तपासादरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित केदार, व पोलिस शिपाई कैलास वाकचौरे, यांनी प्राप्त मोबाईल क्रमांकांची तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक सपकाळे, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्ष्म तांत्रिक विश्लेषण केले,
व त्याआधारे वेळोवेळी संबंधीत पोलीस स्टेशन, शाखा यांचेशी संपर्क साधुन सदर अहप्त बालिकेच्या तत्कालीन ठिकाणांचा वेळोवेळी पाठ पुरावा करून रेल्वे स्टेशन परिसरातुन सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर योग्य कायदेशिर प्रक्रियेद्वारे पंचवटी पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्यांचे पालकांचे ताब्यात सुखरूप देण्यात आलेले आहे. सदर | गुन्हयाची उकल तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे करण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित केदार, हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश, शिंदे, पोलीस उप आयुक्त, किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक सपकाळे, बगाडे ,
पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, वाकचौरे, वैभव परदेशी, अशांनी संयुक्तिक रित्या कामगिरी केलेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *