एका गोणीत आढळून आला महिलेचा “मृतदेह”

नाशिक :- नाशिक दिंडोरीरोड वरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळील रस्त्याच्या लगत गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आज सकाळी नाशिक-दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे.

रस्त्याच्या कडेला संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. महिलेची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे…

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *