“ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा अपघात…

निळवंडे कालवा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा गंभीर अपघात

युवकाची प्रकृती चिंताजनक

संगमनेर तालुक्यातील निळवंडे उजव्या कालव्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा अपघात झाला आहे, अंभोरे डिग्रस मालुंजे या गावातुन निळवंडे उजव्या कालव्याचे काम सुरू आहे, डिग्रस व मालुंजे रस्त्यावर कालव्याच्या पुलाचे बांधकाम रस्त्याच्या मधोमध सुरू आहे,
जवळपास तीस फुट खोल खड्डा पुलाचे बांधकाम करण्यासाठी खोदले आहेत, काम पुर्ण होऊनही खड्डा बुजविला नाही यामुळे हा अपघात झाला आहे असे बोलले जात आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे, रेडियम रिबन, बांबु, दगड,माती लावणे गरजेचे असताना देखिल संबंधित ठेकेदाराने हलगर्जीपणा केला आहे, यामुळे राहुल बाळासाहेब पवार राहणार चिंचपुर वय २३ या युवकाचा अपघात झाला आहे. या अपघातात राहुल गंभीर जखमी झाला आहे.

२८ सप्टेंबर रोजी राहुल बाळासाहेब पवार हे अंभोरे गावात आपल्या पाहुण्यांकडे आले होते, परत चिंचपुर गावाकडे जाताना रात्री ७:३० वाजता सरळ रस्त्याने जात असताना बांधकामाचा व खड्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला आहे, या अपघातात दुचाकी वाहनाचा चक्काचूर झाला आहे तर राहुल पवार यांच्या डोक्याला, छातीला, जबर मार लागला आहे, मोठमोठ्या जखमा झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे, अपघात होऊन बराच वेळ त्याच जागी पडुन राहिल्याने डोक्यातील जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, स्थानिक ग्रामस्थांनी बेशुद्ध अवस्थेत त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पंरतु त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

अंभोरे डिग्रस मालुंजे या गावातील ग्रामस्थांनी ठेकेदार व बांधकाम सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही, यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहे, डिग्रस गावचे सरपंच अशोक रखमाजी खेमनर, अंभोरे सरपंच भाऊसाहेब खेमनर, अनिल शिवराम खेमनर यांनी अपघातग्रस्त राहुल बाळासाहेब पवार यांच्या उपचारांची दखल घ्यावी, पुल बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक कठडे, रेडियम रिबन बांबु, मातीचा ढिगारा तयार करण्याची मागणी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *