नाशिकरोडला पाच वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला…

नाशिक :- प्रतिनिधी चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेला जवळ बोलावून तिच्या अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या परप्रांतीय तरुणास नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पाच वर्षीय बालिका ही बिटको कॉलेजमागील एका मळ्यात उच्चभ्रू सोसायटीत राहते.या सोसायटीत रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तेथील गणेश मंडपात इतर मुलांबरोबर आरतीसाठी आली होती.आरतीनंतर ही मुलगी घरी जात असताना परप्रांतीय आरोपी महिर मनोज बर्मन (वय 23, रा.ओडीपतोरा, ता. उजीहरा, जि. सतना,मध्य प्रदेश) हा गर्दुल्ला तरुण तेथे आला.त्याने या अल्पवयीन बालिकेला चॉकलेटच्या आमिषाने बालिकाला त्याच्याजवळ बोलावलर.काही कळण्याच्या आतच तो या बालिकेला कडेवर उचलून घेऊन जाऊ लागला. ही बाब तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला अडवले व त्याच्या ताब्यातून या मुलीची सुटका केली.
यानंतर ही माहिती उपनगर पोलीस ठाण्यास कळविण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी पकडून ठेवलेला आरोपी महिर बर्मन याला पोलिसांच्या हवाली केले.या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *