“आरोग्यदीप फाउंडेशन च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन” ..

0 minutes, 0 seconds Read

नासिक :- आरोग्यदीप फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.महादेव सुरासे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प मल्टी- स्पेशालिटी हॉस्पिटल, कार्बन नाका शिवाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ.पुरुषोत्तम पुरी सर यांचे रक्तदानाविषयी सखोल मार्गदर्शन मिळाले . या रक्तदान शिबिराला सातपूर परिसरातील असंख्य युवकांनी व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .

या कार्यक्रमासाठी आरोग्यदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.राहुल येवले उपाध्यक्ष डॉ.महादेव सुरासे , नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ.वैभव येवले, डॉ.संदीप पाटील, डॉ.राम चव्हाण, समुपदेशक अर्चना जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.आरोग्यदीप फाउंडेशनच्या आरोग्यविषयक सर्व उपक्रमांविषयी डॉ.राहुल येवले यांनी उपस्थितांना माहिती दिली. डॉ.नेहा सूर्यवंशी यांनी कार्यक्रम सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला मिळाल्यावर उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आरोग्यदीप फाउंडेशन आणि संकल्प हॉस्पिटल यांच्याकडून सर्व शासकीय रक्तपेढी अधिकारी , कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *