धक्कादायक… बनावट पॅथॉलॉजी लॅबचे रॅकेट उघडकीस.मुक्त विद्यापीठापर्यंत लोण…

0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब सुरु करणा-या राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चार एजंट विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे हे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात मुक्त विद्यापीठाच्या चौकशी समितीने २० विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून बनावट कागदपत्रे कोणाकडून घेतली याबाबतीत चौकशी सुरु केली. त्यानंतर १४ जणांच्या चौकशीत चार जणांची नावे आली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या चार जणांमध्ये नागपूरचा गौरव शिरसकर (नागपूर), रमेश होनामोरे (सातारा), अशोक सोनवणे (अहमदनगर) आणि संजय नायर (नांदगाव) यांचा समावेश आहे. २०२०-२१ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या २० विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापिठाच्या नावाचे बनावट मार्कशीट, सर्टिफिकेट तयार केले होते. त्यानंतर लॅब सुरु करण्याची मान्यता घेण्यासाठी पॅरामेडिकल काउन्सिलकडे अर्ज केला होता. या अर्जासोबत जोडलेली कागदपत्र बनावट असल्याचा संशय आल्यामुळे पॅरामेडिकल कॅालेजने पडताळणीसाठी मुक्त विद्यापीठाकाडे विचारण केली व त्यानंतर हा भांडाफोड झाला.

त्रिसदस्यीय चौकशी समिती
पॅरामेडिकल काउन्सिलने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केल्यानंतर हे विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतं नसल्याचे समोर आले. यानंतर मुक्त विद्यापीठाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी केली असता विद्यापीठचे बनावट सही, शिक्के याच्या माध्यमातून बनावट गुणपत्रक, प्रमाणपत्रक तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर ही कारवाई सुरु झाली. आता पोलिसांचा तपासात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे सही, शिक्के संशयित एजंटपर्यंत कसे पोहचले, विद्यापीठातील कोणी या कारस्थानात गुंतले आहे का हे बघितले जाणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *