इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड Dr.Adv.नीता विजय कदम यांना जाहीर…


पनवेल :- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. ०७ जानेवारी २०२४ रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा व आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास संपूर्ण देशातील
तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत. या या कार्यक्रमात Dr.Adv.नीता विजय कदम यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास नागिरकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केले आहे.प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *