स्टार हॉलिडे होम रिसॉर्टचे संचालक डॉ.महेंद्र देशपांडेटायकॉन्स ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक (प्रतिनिधी) :- टायकॉन्स ऑफ एशिया या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे राज्यभरातून विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना टायकॉन्स ऑफ महाराष्ट्र या प्रतिष्ठीत पुरस्काराने नुकतेच नाशिक येथे हॉटेल सयाजी पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात सापुतारा येथील स्टार हॉलिडे होम हिल रिसॉर्टचे संचालक डॉ. महेंद्र देशपांडे यांना हॉटेलच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल टायकॉन्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. माधुरी देशपांडे उपस्थित होत्या.


सापुतारा येथील स्टार हॉलिडे होम हिल रिसॉटचे डॉ. महेंद्र देशपांडे संचालक असून ग्राहकांसाठी व फॅमिलीसाठी हे हॉटेल अतिशय लोकप्रिय आहे. पर्यटकांना चांगली सेवा वाजवी दरात देऊन कुटुंबवत्सल ग्राहकांची पसंती मिळविलेले सापुतारा हिल्स स्टेशन येथील हे एकमेव हॉटेल आहे. उत्कृष्ट व्यवस्थापना बद्दल ग्राहकांनी दिलेल्या चांगल्या रेटींगच्या आधारावर टायकॉन्स ऑफ एशिया या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. महेेंद्र देशपांडे हे हॉटेल व्यवसाया सोबतच पत्रकारितेमध्येही कार्यरत असून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना नुकतेच गांधी पीस फाऊंडेशन, नेपाळ यांच्या वतीने गांधी पीस नोबल आंतरराष्ट्रीय पुरस्कार व जस्ट डायल यांच्या वतीने बिझिनेस एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.डॉ. महेंद्र देशपांडे यांना हा प्रतिष्टेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *