आडगाव पोलिसांची दमदार कामगिरी एकाच दिवशी अनेक गुन्ह्यांचा छडा…


नाशिक : – गणेशोत्सव काळात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नेतृत्वाखाली आडगाव पोलिसांनी कंबर कसली असून त्याचाच भाग म्हणून आडगाव पोलिसांनी एकाच दिवशी अनेक गुन्ह्यांचा छडा लावल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. त्यात एक मोबाईल चोर सहा मोटरसायकल चोरणारी टोळी. मोहम्मद शाबान शकील अहमद अन्सारी व जुबेर रहमान अतिकुर रहमान पठाण. यांच्याकडून एक लाख ९५ हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल हस्तगत करण्यात आले.
गावठी कट्टा बाळगणाऱ्यां दोन आरोपी दर्शन उर्फ डोन्या भारत कीर्तने वय वर्ष 22 राहणार देवी मंदिराचा मागे आडगाव शिवार व पियुष अशोक येवले वय वर्ष 19 आयोध्या नगरी अमृतधाम २५ हजार रुपया किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा. हस्तगत केले.आडगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या धरल्या असून या कामगिरीने शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,उपायुक्त किरण कुमार चौहान,सह पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्ह्ययदे. पुणे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव,अशोक पाथरे पोलीस निरीक्षक भूषण देवरे,सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, अशोक बस्ते, निलेश काटकर, नानासाहेब वाघ, अरुण अहिरे, निखिल वाघचौरे, दिनेश गुंबाडे, अमोल देशमुख, सचिन बाहेकर, विलास चारोस्कर, इरफान शेख, हेमंत आहेर व आडगाव पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *