जागतिक महिला दिनानिमित्त कल्पना पाटील यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 जाहीर

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक -(विशेष प्रतिनिधी)
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मार्च रोजी नाशिक येथील पलास सभागृह गुरुदक्षिणा संकुल कॉलेज रोड नाशिक येथे दुपारी अडीच वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. उद्योजक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन

नाशिक येथील कल्पना पाटील यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाला नाशिकच्या लोकप्रिय पोलिस अधिकारी व कर्तव्यदक्ष पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांची विशेष उपस्थिती लाभणार असून नाळ चित्रपटाच्या लोकप्रिय नायिका अभिनेत्री देवीका दफ्तरदार, मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2024 विजेत्या ज्योती शिंदे, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आशा पाटील, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण समितीच्या सदस्या सायली पालखेडकर, लोकभारतीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शशिताई अहिरे, पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणारे मंत्राज ग्रीन रिसोर्सेस लि.चे अध्यक्ष डॉ. यु.के. शर्मा, सामाजिक कार्यकर्ते व पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, सापुतारा नोटिफाईड एरियाचे मुख्य अधिकारी डॉ. चिंतन वैष्णव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कृतिका मराठे यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *